Homeउद्योगआवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२६’ पटकावला आहे. अवघ्या कमी वयात उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करत त्यांनी आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

जमीर पठाण हे गंगाखेड शहरात ‘दोस्ती एजन्सी’ या नावाने व्यवसाय चालवत असून, त्यांच्याकडे डी.ए. कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर (साउंड सिस्टीम) ची एजन्सी आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या एजन्सीला ‘मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ या श्रेणीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि. १९ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे आयोजित भव्य गौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते जमीर पठाण यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांचे वडील सुलेमान पठाण, काका बाबा पठाण, बंधू सरवर पठाण, आमिर पठाण तसेच मामा इस्माईल शेख आणि इसाक शेख आदी उपस्थित होते.

जमीर पठाण यांच्या या यशामुळे आवलगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या व्यवसायात प्रगती साधत ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली आहे.

डी.ए. कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही साउंड सिस्टीम कॅबिनेट तयार करणारी विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या चार वर्षांपासून जमीर पठाण आपल्या बंधूंना सोबत घेऊन व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या या यशोगाथेमुळे अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

जमीर पठाण यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!