Homeमहाराष्ट्रगेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, हा आध्यात्मिक सोहळा दि. २६ एप्रिल ते २ मे २०२६ दरम्यान रंगणार आहे. सुप्रसिद्ध कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी यांच्या मधुर आणि प्रभावी वाणीमधून दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत भाविकांना ज्ञानामृताचा लाभ मिळणार आहे.

या सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आणि भूमिपूजन कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध संत-महंत तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमास भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र बेदरे, माजी जि.प. सदस्य जालिंदर पिसाळ, तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र (दादा) बेदरे यांनी नागरिकांना आवाहन करत, या पवित्र श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगितले.

या सात दिवसांच्या आध्यात्मिक पर्वामुळे गेवराई शहरात भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक वातावरणाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या आयोजनामुळे भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळण्याबरोबरच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!