Homeउद्योगविमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा 'ॲक्शन मोड'मध्ये; टाईम्स ऑफ...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा ‘इम्पॅक्ट’…

Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या अनधिकृत वापरामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, आता मात्र पुणे महानगरपालिकेने काही आस्थापनांना नोटिसा बजावल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, कोणार्क नगर परिसरातील रो-हाऊसेस मूळतः निवासी वापरासाठी मंजूर आहेत. मात्र, या ठिकाणी अनेक नामांकित रेस्टॉरंट्स आणि कॅफे सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये प्रामुख्याने खालील आस्थापनांचा समावेश आहे:

Yeti & The Monk, After Hours, Coffee Nation, The Nook Diner, Where Else Diner, Dohiti Bake House

नियमांची सर्रास पायमल्ली

झोनिंग नियमांनुसार निवासी क्षेत्रात कोणत्याही व्यावसायिक उपक्रमासाठी विशेष परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र, या आस्थापनांनी निवासी वापराच्या जागेवर रेस्टॉरंट्स थाटून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर, विकास नियंत्रण नियमांनुसार ‘फ्रंट’ आणि ‘साईड मार्जिन’ मोकळे ठेवणे बंधनकारक असताना, त्या मोकळ्या जागेत शेड्स, टेबल-खुर्च्या आणि इतर बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले होते.

कायद्याचा बडगा: MRTP अंतर्गत कारवाईची टांगती तलवार

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) नुसार, मंजूर नकाशाच्या व्यतिरिक्त केलेला वापर किंवा अनधिकृत बांधकाम हा गंभीर गुन्हा मानला जातो. या कायद्यांतर्गत:

संबंधित मालकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे.

नियमबाह्य बांधकामावर दंड आकारणे.

अनधिकृत वापर त्वरित थांबवण्याचे आदेश देणे.

नियमभंग सुरूच राहिल्यास मालमत्ता सील करणे.

अशा कठोर कारवायांचे अधिकार महापालिका प्रशासनाला आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएमसीने आधीच यातील काही आस्थापनांना नोटिसा धाडल्या असून प्रशासकीय स्तरावर चौकशी सुरू झाली आहे.

रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्या

स्थानिक रहिवाशांनी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’कडे आपल्या तक्रारी मांडताना सांगितले की, “निवासी भागात अशा व्यावसायिक हालचाली वाढल्यामुळे आमची शांतता भंग पावली आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारा गोंगाट म्हणजेच ध्वनीप्रदूषण, येणाऱ्या ग्राहकांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न यामुळे जगणे कठीण झाले आहे.”

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा ‘इम्पॅक्ट’

महापालिकेने नोटिसा बजावल्या असल्या तरी अद्याप अधिकृतपणे माहिती जाहीर केलेली नाही. मनपा प्रशासन यावर कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत असून, जोपर्यंत अनधिकृत वापराला चाप लागत नाही, तोपर्यंत आमचे लक्ष यावर राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

error: Content is protected !!