Homeक्राईमहस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह राजवडी, बिजवडी, पाचवड आणि परिसरातील वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ एप्रिल २०२६ रोजी बुधवारी रात्री घडली. हस्तनपूर येथील शेतकरी विकास खताळ यांच्या गोठ्यात देशी जातीच्या खिल्लार गायी बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने गोठ्यावर हल्ला करून एका वासराला ओढून नेले आणि गंभीर जखमी केले. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेपूर्वीही परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मोगराळे, पाचवड, अनुभलेवाडी आणि हस्तनपूर परिसरात बिबट्याच्या खुणा आढळल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हस्तनपूरचे सरपंच तानाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी वनविभागाने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री बाहेर पडणे कठीण झाले असून आता जनावरांवरही हल्ले होऊ लागले आहेत. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी,” अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!