Homeउद्योगलिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे. दि. १७ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून, बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या आंदोलनामागे कृषी विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असून, विशेषतः कंपन्यांकडून राबवण्यात येणाऱ्या लिंकिंग (Linking) प्रणालीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने घ्यावी लागतात, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आणि विक्रेत्यांनाही अतिरिक्त ताण सहन करावा लागतो. याशिवाय, वाढती नियमावली, परवाना प्रक्रिया, तपासण्या आणि वाहतूक खर्च यामुळे लहान व मध्यम विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

संघटनेने या बंद आंदोलनासाठी स्पष्ट आणि कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे १००% बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची खते, बियाणे किंवा कीटकनाशकांची विक्री केली जाणार नाही. दुकाने व गोदामातून मालाची देवाणघेवाण थांबवण्यात आली आहे. कंपन्यांकडून येणारा माल स्वीकारण्यासही मनाई करण्यात आली असून, कोणत्याही ग्राहक, व्यापारी किंवा शेतकऱ्याला माल देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाचा उद्देश केवळ विरोध नोंदवणे नसून शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजावून सांगणे हाही आहे. त्यामुळे राज्यभरात स्थानिक पातळीवर सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच पत्रकार परिषदेद्वारे शासन आणि संबंधित कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान, या बंद आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम शेतकरी वर्गावर होताना दिसत आहे. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर हा बंद दीर्घकाळ सुरू राहिला, तर पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

संघटनेने स्पष्ट केले आहे की, हा बंद कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या हितासाठी आहे. शासनाकडून सकारात्मक निर्णय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संघटनेच्या पुढील आदेशाशिवाय कोणत्याही विक्रेत्याने बंद मागे घेऊ नये, अन्यथा संघटनात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व्यवस्था काही काळ विस्कळीत होण्याची शक्यता असून, शेतकरी, विक्रेते आणि प्रशासन यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!