Homeताज्या बातम्याबुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

वाशिम – (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही. “अत्त दीप भव” – स्वतःच स्वतःचा दीप व्हा, हाच त्याचा मूळ संदेश. पण नंतरच्या काळात याच बुद्धाला देव बनवून त्याचा मूळ विद्रोही इतिहास झाकण्याचे प्रयत्न झाले असे कोळगाव बु.येथील व्याख्यानात व्याख्याते गोपाल भिसडे म्हणाले,

बौध्द पौर्णिमा निमित्त मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु.येथील बांधवानी अतिशय सुंदर अशा बौध्द पौर्णिमेच्या प्रभोधन कार्यक्रमाचे आयोजन केले, या कार्यक्रमात पंचक्रोशीतील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती, भिसडे म्हणाले बुद्ध तत्त्वज्ञानी होते, त्यानी 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग देऊन दुःखाचे कारण आणि त्यावर उपाय सांगितला.

त्यात कुठेही पूजा, कर्मकांड, यज्ञ, नाही.बुद्ध समाजसुधारक होते त्यानी वर्णव्यवस्था, यज्ञातील हिंसा पुरोहितशाही यांना थेट नाकारले. स्त्रियांना आणि शूद्रांना संघात प्रवेश दिला. हा तत्कालीन व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा विद्रोह होता. पुढे व्याख्याते म्हणाले बुद्ध नास्तिक नव्हते , पण अनीश्वरवादी होते त्यानी आत्मा, परमात्मा, सृष्टीकर्ता यावर मौन बाळगले. प्रश्नच चुकीचा आहे, असे त्याचे म्हणणे. माणसाचे दुःख आणि त्याचे निवारण हाच त्याचा विषय. नंतरच्या काळात बुध्दाचे

दैवतीकरण कसे सुरू झाले? यावर गोपाल भिसडे यांनी भाष्य केले,

बुद्धसंघात मूर्ती नव्हत्या. फक्त स्तूप, बोधिवृक्ष, पदचिन्हे होती. ग्रीक प्रभावामुळे गांधार शैलीत बुद्धाच्या मूर्ती बनल्या. पुढे त्याला विष्णूचा 9वा अवतार घोषित केले गेले. वैदिक व्यवस्थेला नाकारणारा बुद्ध, त्याच व्यवस्थेचा भाग बनवला गेला.लोक बुद्धपौर्णिमेला दिवे लावतात, पण त्यानी सांगितलेले शील, समाधी, प्रज्ञा यावर चालणारे किती लोकं आहेत अस प्रभोधन करून उपस्थित बांधवाना विचार करायला लावला त्याचसोबत राजा बिंदूसार, अंगुलीमाल बुद्धाच्या तत्वज्ञान पाहून शरनास गेला, एवढेच नव्हे तर बुद्धचा विचार संबंध जगात पोहचला पाहिजे यासाठी ज्यांनी बुद्ध कळताच आयुष्यभर बौध्द धम्माचा प्रचार प्रसार केला ते म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांनी 84,000 बौध्द स्तूप

विहारे बांधले/जीर्णोद्धार केला. आज त्यातले फक्त सांची, सारनाथ, वैशालीसारखे काही मोजकेच शिल्लक आहेत. 7व्या शतकापर्यंत अनेक स्तूप अस्तित्वात होते आज कशाप्रकारे तथागत गौतम बुद्ध व सम्राट अशोक यांचे विचार लोप पावले त्यांचा इतिहासाचे शोषण कसे झाले यावर भिसडे यांनी वेगवेगळे उदा देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला म्हणून

आज बुद्धाची सम्राट अशोकाच्या विचारांची काय गरज आहे? असे गोपाल भिसडे म्हणाले बुद्धाला देवाच्या सिंहासनावरून खाली उतरवून पुन्हा माणसात आणण्याची गरज आहे. त्याची मूर्ती फोडायची नाही, त्याच्या विचारांची चिकित्सा करायची आहे, बुद्धविचार समजून घेणे हीच खरी बुद्ध जयंती. म्हणून त्यांचे दैवतीकरणं थांबवने व जगला खरे बुद्ध सांगावे असे व्याख्याते गोपाल भिसडे यांनी व्याख्याना दरम्यान आपले विचार मांडले, हा कार्यक्रम यशस्वी घडण्यासाठी कोळगाव येथील पंचशील नवयुवक टीम अनिल म. इंगळे (अध्यक्ष) शरद पां. इंगळे ( उपाध्यक्ष),सुनील दाभाडे (उपाध्यक्ष) रोशन इंगळे,

अश्विन कंकाळ,प्रशांत इंगळे करण इंगळे,अजित इंगळे,ऋषिकेश इंगळे,अतुल दिपके,सुरज इंगळे,स्वप्निल इंगळे,सुशील ताजणे,गणेश भा.कंकाळ नंदू सु.इंगळे,नवीन शि. इंगळे,रवी इंगळे,संदीप तायडे,अनिरुद्ध लबडे,नितीन पवार,दिनकर मोरे, भीमराव लबडे,जिजोबा पवार,विशाल इंगळे,सुमित इंगळे,श्रीकांत,साळवे,नितीन इंगळे,रुपेश इंगळे, अक्षय प्र. इंगळे, निलेश इंगळे, विकास इंगळे तथा पंचशील नवक मंडळ कोळगाव बु. व सर्व महिला गावकरी मंडळी यांचे अगदी मोलाचे सहकार्य लाभले यावेळी डॉ. नारायण शेंडगे,श्री.दीपक शेंडगे ( पो. पा )डॉ. ज्ञानेश्वर पवार, श्री.गजानन तहकीक, श्री.विजय शेंडगे ( तालुका उपाध्यक्ष ( ऊ. बा. ठा गट वाशिम )श्री.राहुल वाकुडे, श्री.अशोक इंगळे, व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील इंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!