Homeक्राईमसावरगाव येथील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीने घेतली भेट...

सावरगाव येथील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीने घेतली भेट…

पातूर, अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथे 10 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

घराशेजारी राहणाऱ्या नराधमाने सलग तीन दिवस संबंधित चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देईल, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

भेटीदरम्यान अकोला जिल्हा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ, मायाताई इंगळे, मंदाताई शिरसाट, पातूर तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष विक्रमसिंग जाधव, तालुका महिला आघाडी अध्यक्षा अर्चनाताई डाबेराव, माजी उपसभापती इमरान खान, मुमताज खान, तालुका महासचिव मंगेश गोळे, कोषाध्यक्ष राजीवभाई, राणा डाबेराव, दिलीप ताजने, अमित ताजने, निलेश करवते उपस्थित होते.

तसेच बाळापूर पंचायत समितीच्या माजी सभापती रूपालीताई गवई, मीनाक्षीताई शेळके, सरलाताई मेश्राम, उमाताई अंभोरे, वर्षाताई अंभोरे, सुरेखाताई डाखोरे, उमेश गवई, भास्कर अंभोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

error: Content is protected !!