Homeमहाराष्ट्रराकेश तिवाटणे यांचे अपघाती निधन

राकेश तिवाटणे यांचे अपघाती निधन

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : म्हसवड येथील इलेक्ट्रिशन म्हणुन सुप्रसिद्ध असलेले राकेश गजानन तिवाटणे यांचे दि.१० रोजी रात्री दुचाकीच्या धडकेने झालेल्या अपघातांत अपघाती निधन झाले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी येथील माळशिरस चौकातुन ते आपल्या घरी म्हसवड येथे दुचाकीवरुन निघाले असताना पंढरपुर रोडवरुन सुसाट वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये राकेश तिवाटणे हे गंभीररित्या जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले शहाजी माने हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत. राकेश तिवाटणे हे स्वत: दुचाकी चालवत होते ते व शहाजी माने हे दोघेजण म्हसवड शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर कामानिमीत्त ते गेले होते, तेथील काम आटोपुन ते रात्री आपल्या दुचाकीवरुन रात्री ८ च्या सुमारास घरी निघाले असताना त्यांची मोटारसायकल येथील माळशिरस चौकात आली असता पंढरपुर रस्त्यावरुन भरधाव वेगाने ट्रिपल सीट आलेल्या दुचाकी स्वाराने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली या धडकेने तिवाटणे यांचा एक पाय अक्षरशा जागेवरच तुटला त्यामुळे ते डांबरी रस्त्यावर पडले यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते, त्यांना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने तिवाटणे यांना पंढरपुर येथे उपचार्थ नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले, त्यानंतर तिवाटणे यांचे शव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, याठिकाणी शवविच्छेदनाची सोय नसल्याने त्यांचे पार्थिव पहाटे दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्याठिकाणी त्यांच्या मृत्युदेहाचे शव विच्छेदन करुन त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी ने फोडलेला हंबरडा पाहुन अनेकांचे डोळे पाणावले. राकेश तिवाटणे हे नेहमीच सर्वांसाठी धावुन जाणारे व्यक्तीमत्व म्हणुन परिसरात सुपरिचित होते. त्यामुळे शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. हे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील वैकुंठ स्मशान भुमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी महानभव पंथ स्विकारल्याने त्या पंथानुसार त्यांच्यावर संस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता, या निमित्त येथील माळशिरस चौक, मायणी चौक व शिंगणापुर चौक याठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी अनेकांकडुन व्यक्त करण्यात आली.
दरम्यान राकेश तिवाटणे हे पालिका अभियंता नितीन तिवाटणे यांचे धाकटे बंधु असुन त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान राकेश तिवाटणे यांचे सोबत पाठीमागे बसलेले शहाजी माने हे सुध्दा गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!