Homeमहाराष्ट्रपोलीस महसुलाच्या आशीर्वादाने मृत्यूचा खेळ सुरू

पोलीस महसुलाच्या आशीर्वादाने मृत्यूचा खेळ सुरू

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सर्रासपणे अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. याच अवैध वाळू उपशाने सोमवारी एका मजुराचा बळी गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरीनदी पात्रालगत वाळू हायवात वाळु भरत असताना लेडरच्या खोऱ्यातील दगड डोक्यात पडून सचिन आत्माराम पुरी वय वर्ष 30 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या परिसरातून रोजच अवैध वाळू उपसा होत असतो. गोदावरीनदी पात्रात व पात्रालगत मोठ्या खदानी असून, या खोलगट खदानीत लोडर ट्रॅक्टर उतरून सोमवारी अवैध वाळू उपसा करताना सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साधारण १५ ते २० फुट खोल असलेल्या खदानीत वाळू उपसा सुरू असताना हायवात वाळू भरत असताना लोडरच्या खोऱ्यातील एक मोठा दगड डोक्यात पडून सचिन आत्माराम पुरी वय वर्ष 30 यांचा जागीच मृत्यू झाला

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला थोडी धडधड सुरू होती म्हणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यामध्येच मृत्यू झाला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील गेवराई येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी वाळूचा लोडर ट्रॅक्टर जप्त केला असून, दुर्घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात लोडर ट्रॅक्टर मालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे म्हटले आहे.

तर दुर्घटना घडली नसती

सावळेश्वर परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असतो. याबाबत सावळेश्वर येथील सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूल व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष का दिले गेले नाही? वाळूमाफियांना प्रशासन पाठिशी घालत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यामुळे महसूल व पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर ही दुर्घटना घडली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाळू उपसा सुरुच

तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत कठोर कारवाई होत नसल्यानेच वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे. सध्या गोदावरी नदीमध्ये व सिंदफना नदीमध्ये नदीपात्रात पाणी नसल्यामुळे दररोज वाळू उपसा होत आहे आज देखील गोदावरी नदी काठावरील गावात अवैध वाळूउपसा होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रालगत गावात असलेल्या गावठाण जमिनीवरील खदानीतून वाळू उपसा सुरू आहे. याबाबत महसूल व पोलिस प्रशासन कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!