Homeमहाराष्ट्रजळगावात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद; ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट...

जळगावात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद; ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट डिस्काउंटविरोधात तीव्र आंदोलन

जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार) : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिली आहे. जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील विविध मेडिकल दुकानदारांनी या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविला असून शहरातील अनेक मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

या आंदोलनामागील प्रमुख मागण्या म्हणजे ऑनलाइन औषध विक्री तात्काळ बंद करणे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक डिस्काउंटला आळा घालणे तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देशाला वाचविणे या आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांच्या आरोग्याशीही गंभीर खेळ केला जात आहे.

AIOCD ने केंद्र सरकारला GSR 817 दिनांक 28 ऑगस्ट 2018 मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच कोविड काळात लागू करण्यात आलेल्या GSR 220 दिनांक 26 मार्च 2020 संदर्भातील नियमांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. “रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये,” असा इशाराही संघटनेने दिला आहे.
जळगावातील “अवनी मेडिकल” यासह अनेक मेडिकल व्यावसायिकांनी दुकानांवर बंदच्या सूचना लावून या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. व्यापाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत एकजूट दिसून येत असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व सचिव राजीव सिंघल करत आहेत. महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि सचिव अनिल नांवंदर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झावर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांच्या या बंदमुळे काही प्रमाणात ग्राहकांना गैरसोय होण्याची शक्यता असली तरी, “ही लढाई केवळ व्यापाऱ्यांसाठी नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!