Homeक्राईमरेती माफिया विरुद्ध धडक कारवाई; 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

रेती माफिया विरुद्ध धडक कारवाई; 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे) :  दिनांक १७ मे २०२६रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील शिनगाव जहागीर शिवारातील संत चोखामेळा धरण परिसरात बोटीद्वारे सुरू असलेल्या रेती उपशावर देऊळगाव राजा पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने धडक कारवाई करत तब्बल 81 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना संत चोखामेळा धरण परिसरात बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तातडीने संयुक्त कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते पोलीस कर्मचारी प्रवीण डोईफोडे व शिवाजी दराडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

संत चोखामेळा धरण परिसरात बोटीद्वारे पेट्रोलिंग करताना जलाशयात काही इसम रेतीचा उपसा करून चोरी करताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयीत दुसऱ्या बोटीतून प्रसार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनास्थळी असलेल्या तीन मोठ्या लोखंडी बोटी व रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनियुक्त तीन लहान बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या या बोटीमध्ये एकूण नऊ ब्रास रेती आढळून आली.

या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून शेख
फिटू शेख मुस्ताक वय 30 वर्ष राहणार अनामत तालुका राजमहल जिल्हा साहेब गंज राज्य झारखंड यास ताब्यात घेण्यात आले. पंचा समक्ष करण्यात आलेल्या या पंचनाम्यात तीन मोठ्या लोखंडी बोटी तीन इंजिनियुक्त लहान बोटी जोडणी साहित्य व नऊ ब्रास रेती असा एकूण 81 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफी याचे धाबे दणाणले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!