Homeताज्या बातम्याकर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात निवड

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून केंद्रातील तीन प्रशिक्षणार्थींची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये कुमार चेतन अनिल कुलकर्णी, रविंद्र संगीता सुधाकर माळी आणि भूषण राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे.या यशस्वी प्रशिक्षणार्थींचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे व संचालक रोहित रंधे यांनी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास श्री युवराज पाटील, संस्थेचे व्यवस्थापक श्री. ए. ए. पाटील, समन्वयक श्री. सागर वाघ, श्री. संजय जगदेव, प्रशिक्षक श्री. विजेंद्र जाधव, श्री. सागर कोळी, श्री देवेन बुवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशिक्षणार्थींच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले.

विशेष म्हणजे, कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्र हे परिसरातील सर्वसामान्य, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील
विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारे एकमेव केंद्र म्हणून ओळखले जाते. सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना येथे शारीरिक, बौद्धिक व स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन विनामूल्य दिले जाते.केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक युवकांना पोलीस, सैन्य व विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळाले असून या यशस्वी परंपरेत मुंबई पोलीस दलातील या ताज्या निवडीमुळे आणखी भर पडली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार प्रशिक्षण आणि आत्मविश्वास देण्याचे कार्य केंद्र सातत्याने करत असून या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.मुंबई पोलीस दलात झालेली ही निवड केवळ संबंधित प्रशिक्षणार्थींसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी, संस्थेसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आमने-सामने; निशेश बोरा विरुद्ध गणेश गिते संघर्ष,...

0
नाशिक जिल्हा ,निफाड तालुका (प्रतिनिधी योगेश कर्डिले ,उत्तम जाधव ) : नाशिक, 29 मे 2026: विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...

जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? ससाणेनगर कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामावर पै. उल्हास तुपे...

0
हडपसर (प्रतिनिधि धीरज महानगरे):  प्रशासन फक्त पत्रे आणि सूचना फलक लावून जबाबदारी झटकत असल्याचा राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांचा...

रखडलेली विकासकामे, प्रलंबित फाईली अन् नाराज कंत्राटदार; चंद्रपूर मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
चंद्रपूर मनपात वाढती नाराजी, रखडलेली कामे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह? चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : महानगरपालिकेच्या प्रशासनात सध्या नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न सर्वसामान्य...

error: Content is protected !!