Homeताज्या बातम्यामराठी कलाकारांच्या सन्मानासाठी सक्षम पॅनेलला साथ द्या : मेहराज भोसले

मराठी कलाकारांच्या सन्मानासाठी सक्षम पॅनेलला साथ द्या : मेहराज भोसले

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि सभासदांचा महत्त्वपूर्ण मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मेळाव्यात बोलताना मेहराज भोसले यांनी मराठी कलाकारांचा सन्मान, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सक्षम पॅनेल’ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा आणि नवसंजीवनी देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि सभासदांच्या अडचणी, महामंडळाच्या कामकाजातील सुधारणा, तसेच भविष्यातील धोरणे आणि विकासात्मक उपक्रमांवर विचारमंथन करण्यात आले.

या मेळाव्यास उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, संगमनेर आदी भागांतील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीच्या उन्नतीसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास मेहराज भोसले, रमेश तलवारे, सुनील लंगे, श्याम लोंढे, रफिक सय्यद, रोशन जाधव, नितेश दारकांडे, ललित निकम, सचिन निकम, सत्यशिल पवार, अरुण गिते, अमित मायकेकर, सतीश वाणी, सुनील गावंडे यांच्यासह अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

मेळाव्याच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच आगामी निवडणुकीत सभासदांनी मोठ्या संख्येने मतदान करून सक्षम नेतृत्वाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!