Homeताज्या बातम्याआलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत अनेक घरांमध्ये घुसून नागरिकांना मारहाण व दमदाटी करत तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० जून रोजी पहाटे १ ते ३.१० वाजण्याच्या दरम्यान आलेगाव व खोरवडी गावांच्या हद्दीतील विविध वाड्या-वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढवला. आरोपींकडे चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व दगड अशी घातक हत्यारे होती. त्यांनी घरांमध्ये घुसून नागरिकांना मारहाण केली, शिवीगाळ व धमकावून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच दुचाकी वाहने जबरदस्तीने चोरून नेली.

या दरोड्यात विविध घरांमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व दोन दुचाकी वाहने असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. ३९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२), ३११, ११८(१) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम पुढील तपास करीत आहेत. मध्यरात्री झालेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे आलेगाव व खोरवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!