Homeताज्या बातम्याराष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन व भुईमूग पिकावरील शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन व भुईमूग पिकावरील शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

सिन्नर ( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व भुईमूग पिकावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. भरत मालुंजकर, वरिष्ठ संशोधन सहायक, गहू संशोधन केंद्र, निफाड यांनी सोयाबीन व भुईमूग पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पीक लागवडीत आवश्यक बदल, बीबीएफ पद्धतीचा अवलंब, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, आंतरमशागत तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ‘पंचसूत्री’ची माहिती देण्यात आली. सुधारित वाणांचा वापर, हेक्टरी योग्य झाडसंख्या राखणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण तसेच योग्य वेळी काढणी व मळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी प्रास्ताविकात अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या हवामान परिस्थितीत शास्त्रीय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी, बीटीएम गोकुळ जाधव, उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत सुधारित तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. एल निनोच्या संभाव्य प्रभावाचा विचार करून हवामानानुकूल तंत्रज्ञान व एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळू शकते, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!