Homeताज्या बातम्याजागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती

गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या सुविधा सहजपणे मिळाव्यात या उद्देशाने जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात नायब तहसीलदार सुहास हजारे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर आणि नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रतेचे निकष तसेच लाभ मिळविण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सहाय्य योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. शासनाच्या विविध निर्णयांनुसार एकल महिलांना आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी लाभ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती उपस्थितांना समजावून सांगण्यात आली.
महिलांना ऑनलाइन सेवा, महाऑनलाइन केंद्रांमार्फत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार संलग्नीकरण, बँक खाते, तसेच विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आम्रपाली साबळे, अयशा रेहाना पठाण तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता, स्वावलंबन आणि न्याय्य हक्कांसाठी शासन कटिबद्ध असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
शासनाच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि सहाय्य उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!