Homeताज्या बातम्याहजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन; कठोर...

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन; कठोर कारवाईची मागणी.

बबनराव नागरे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा : सोशल मीडियावर नाझिया इलाही खान यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ दिनांक ३जुलै २०२६रोजमंगळवारला मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव स्थानिक पोलीस ठाण्यात एकत्र आले. संबंधित महिलेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत मोहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श व पूजनीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या असून अशा प्रकारची विधाने सामाजिक सलोखा बिघडविणारी व शांततेस बाधा आणणारी असल्याचे समाजबांधवांनी म्हटले आहे.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महिलेविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यांवर कठोर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केली.

यावेळी चिखली रोडवरील श्री भगवान बाबा चौक येथून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अशपाक शहा, अनावर खान (नगरसेवक), शेख गौस, जाहीर खान, मोहसीन शेख, वसीम शहा, रवी पिंपळे, नासेर शहा, शेख सलमान, शेख अलीम, आमीर खान, शोहेब शहा, आयन अली, अब्दुल शाह, राजिक शहा, अरबाज मिर्झा यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापानेर जिल्हा परिषद प्रशालेस तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची पालकांची मागणी

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी...

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानी एसीबीचा मोठा छापा; तब्बल २.२४ कोटींची रोकड व मौल्यवान ऐवज जप्त

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे मोठी कारवाई करत मुद्रांक विभागाचे...

आरटीओचा काळा खेळ! ‘लहान मासे’ जाळ्यात… पण ‘मोठ्या मगरमच्छांना’ अभय कुणाचे?

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज विदर्भातील आरटीओ विभागात कारवाईचा धडाका; पण 'बड्या' अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी कधी? भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणार की फक्त औपचारिकता? नागपूर:विदर्भातील...

“बंदीचा फक्त कागद… कारवाई कुठे? महामाया कोल वॉशरीवर प्रशासनाची ‘मूक कृपा’ की संगनमत?”

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज (MPCB चा बंदी आदेश, वीज विभागाची नोटीस, तरीही सुरू कोळशाची वाहतूक; पाणी, वीज आणि प्रशासनाच्या भूमिकेवर...

वन विभागात खळबळ! १०९ कोटींच्या वृक्षलागवड घोटाळ्याची CBI चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्षलागवडीच्या नावाखाली तब्बल १०९ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याचे...

error: Content is protected !!