देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉइस ऑफ इंडिया तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल-श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तिन्ही पत्रकारांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. समाजहितासाठी निर्भीड व निःपक्ष पत्रकारिता करत राहून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.

कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ इंडिया तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी सर्वांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






















