Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण सूचना

अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता कृषी मंत्री दत्तात्रय जी भरणे यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक संपन्न बैठकीला आमदार रणधीर सावरकर यांची महत्वपूर्ण उपस्थिती,

आज (दि- १५ जुलै २०२६) रोजी मा.दत्तात्रयजी भरणे, क्रूषि मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय दालनामध्ये महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री, तसेच साठवणूक करणाऱ्या सर्वच संस्थांच्या संदर्भात स्वतंत्र मानक कार्यपद्धती (SOP) विकसित करून राज्यभर अंमलात आणणेबाबत गठीत करण्यात आलेल्या समीतच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली,

बैठकीला आमदार रणधीर सावरकरांना पाचारण करण्यात आले होते, राज्यातील बियाणे कादद्द्यासंबधाने सखोल चर्चा करण्यात आली, अस्तित्वातील कायदे व आज परीस्थितीत करावयाचे सुधारित कायदे याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली, बैठकीत आमदार सावरकरांनी आजच्या खरीप हंगामातील बोगस सोयाबीन बियाणे, उलटलेल्या पेरण्या, क्रुषि विभागाचा बेजबाबदार व गलथान कारभार यावर सविस्तर व परखडपणे टीप्पणी केली, सोयाबीन व इतर बियाणे बाबतीत काय पद्धती असाव्यात तसेच विद्दमान कायद्यात काय बदल करायचे , याबाबत काय आणि कशा कराव्यात अशा सुधारणा आणि सूचना सुचविण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांना ६ पानी पत्राद्वारे सविस्तरपणे लेखी सुधारणा सादर केल्या, या सुधारणांवर सविस्तरपणे अभ्यासपूर्वक निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री, तसेच साठवणूक करणाऱ्या सर्वच संस्थांच्या संदर्भात स्वतंत्र मानक कार्यपद्धती (SOP) विकसित करून राज्यभर अंमलात आणण्यासाठी त्यांनी काही शिफारशी मांडल्या, सर्वप्रथम म्हणजे बियाणे उत्पादक कंपन्यांनी साथी (SATHI) पोर्टलवर आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे

त्याशिवाय कोणत्याही कंपन्यांना राज्यात बियाणे विक्री करण्यात येऊ नये अशी स्पष्ट सूचना आमदार रणधीर सावरकरांनी केली, तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी Certified व Truthfully Labelled (TL) बियाणे उपलब्ध करणाऱ्या सर्व संस्था, जसे की महाबीज, राष्ट्रीय बीज महामंडळ (NSC), राज्य बीज महामंडळे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), खाजगी बियाणे उत्पादक कंपन्या तसेच परराज्यातून बियाणे विक्रीसाठी आणणाऱ्या सर्व कंपन्यांनी संबंधित विक्री हंगाम सुरू होण्यापूर्वी किमान दोन महिन्यांपूर्वी त्यांचा वार्षिक Sales Plan शासनाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात यावा, सदर Sales Plan मध्ये जिल्हानिहाय, गोदामनिहाय, लॉटनिहाय व नियोजित विक्रीचे प्रमाण स्पष्टपणे नमूद करण्यात यावे, जेणेकरून बियाणे नमुना संकलन व गुणवत्ता नियंत्रणाचे प्रभावी नियोजन करता येईल.

Sales Plan मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक बियाणे लॉटची Processing Plant, Godown तसेच घाऊक व किरकोळ विक्रेता स्तरावर त्रिस्तरीय (Three-tier) नमुना तपासणी करण्यात यावी. या त्रिस्तरीय तपासणीमुळे प्रत्येक टप्प्यावर बियाण्याच्या गुणवत्ता मानकांची पडताळणी, लॉटची ट्रेसेबिलिटी व नियामक नियंत्रण अधिक प्रभावी होऊन निकृष्ट, भेसळयुक्त अथवा मानकांशी विसंगत बियाण्यांची विक्री प्रभावीपणे रोखता येईल. याशिवाय बीयाणांचे यांचे नमुने कसे घेण्यात यावे याबाबत सुद्धा SOP कशी तयार करण्यात यावी याचे सुद्धा त्यांनी बैठकीमध्ये सविस्तर विवेचन केले, याशिवाय राज्यामध्ये बियाणे तपासण्याच्या प्रयोगशाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थापन करण्याची मागणी आमदारांचे रणधीर सावरकरांनी कृषी मंत्र्यांकडे केली,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!