गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) मुंबई येथील विद्यार्थी आंदोलनास गेवराई तालुक्यातील किनगाव येथील भूमिपुत्रांनी घेतला सहभाग
संपूर्ण भारतात विद्यार्थी आंदोलन होत आहे आज दिनांक. २२ /०७/२०२६ रोजी दादर येथील चैत्यभूमी येथे आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी गेवराई तालुक्यातील किनगाव येथील सुदीप गायकवाड व यांची पत्नी सीमा गायकवाड यांनी आपले कर्तव्य म्हणून आंदोलनात सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला

भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीची केंद्र सरकार विटंबना करीत आहे याचा निषेध करण्यासाठी गेवराई तालुक्यातील किनगाव येथील सुदीप व सिमा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्पोर्ट म्हणून आंदोलनात सहभाग घेतला याबद्दल गेवराई तालुक्यातून यांचे अभिनंदन होत आहे






















