Homeताज्या बातम्याअंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे –...

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ; प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश, नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी (विनोद पवार) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार अंजनी धरणातून सुमारे ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.*

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये तसेच पूरस्थितीचा अंदाज घेण्याच्या उद्देशाने नदीकाठावर गर्दी करू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी आपल्या गुरेढोरे, पशुधन, शेतीमधील मोटारपंप, कृषी अवजारे व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय नदीपात्रालगत विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे, यंत्रसामग्री व साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असून, सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची तीव्रता आणि पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी हिमा फेडरेशन महाराष्ट्रची ठाम भूमिका; “रुग्णहित सर्वोच्च, सेवा खंडित होऊ...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) मधील नोंदणीच्या प्रश्नावर हिमा फेडरेशन महाराष्ट्र यांनी ठाम भूमिका मांडली असून, हा विषय केवळ डॉक्टरांचा...

सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती...

श्री पावन राजेश्वर गणपतीच्या चरणी रावसाहेब दानवे; मनोज पवारांसह घेतले दर्शन

0
कन्नड:(तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर) श्री पावन राजेश्वर गणपती मंदिर येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) माजी केंद्रीय राज्यमंत्री (रेल्वे) तथा ज्येष्ठ भाजप नेते मा. रावसाहेब...

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

error: Content is protected !!