Homeताज्या बातम्याचांदोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

चांदोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

 चांदोरी: येथे वंचित बहुजन आघाडी व आर पी आय च्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या अच्युत्य साधून श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सिम्बॉल ऑफ नॉलेज सामाजिक संस्था, युवा क्रांतीदीप सामाजिक संघटना व ग्राम पालिका यांच्या विशेष सहकार्याने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन गावातील आश्रम शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी उपस्थित वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांवर प्रकाश टाकला. ” अण्णाभाऊंनी आयुष्यभर कष्टकरी आणि वंचितांचे हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. ” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या. पावसाळ्यात अनेक गरीब विद्यार्थी छत्री किंवा रेनकोट नसल्यामुळे शाळेत येताना अडचणी येतात. हीच अडचण ओळखून वंचित बहुजन आघाडी व आर पी आय च्या माध्यमातून एकत्र येत हा उपक्रम हाती घेतला. रेनकोट मिळाल्यामुळे शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला आरपीआय नेते सुरेश डांगळे, श्री साई सुवर्णभरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष डॉक्टर सारिका ताई नागरे, सरपंच विनायक खरात, आयोजक वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका प्रसिद्धीप्रमुख राहुल उन्हवणे, आश्रम शाळेतील शिक्षक वृंद, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

६ ऑगस्टला ब्रह्मपुरीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा; शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तहसील कार्यालयावर...

0
आमदार विजय वडेट्टीवार व शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा सहभाग ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी समाज तसेच श्रावणबाळ व संजय गांधी...

देलनवाडी वॉर्डात बिबट्याची दहशत: ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली ‘जंगल कॅट’

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी या भागातील रहिवासी...

error: Content is protected !!