Homeताज्या बातम्या८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

पालघर : डहाणू पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
डहाणू पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १८५/२०२३ अन्वये भा.दं.वि. कलम ३७६, ३७७, ३०२, ३०७ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने २७ सप्टेंबर २०२३ रोजी वांगणपाडा, वाणगणवाडा परिसरातील झाडाझुडपात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या डोक्याच्या पाठीमागे व तोंडावर वार करून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून पालघर येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने एकूण २४ साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करत भादंवि कलम ३०२, ३०६, ३०७ तसेच POCSO कायद्यानुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे, तपासी अधिकारी नित्यानंद झा तसेच कोर्ट पैरवी महिला श्रेणीपोउपनि./विद्या नरेश बारे आणि श्रेणीपोउपनि./संजय गावड यांनी कामकाज पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)  जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची, नियमांची व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी, तसेच महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत,...

दूध भेसळीची एसआयटी चौकशी करा मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT)...

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

गोंदे फाट्यावरील ढाब्यावर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक–पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील ढाब्यावर सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वावी पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

error: Content is protected !!