Homeताज्या बातम्यामहापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण;...

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)  जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची, नियमांची व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी, तसेच महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत, यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने नाशिक येथे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ७ व शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या प्रशिक्षणात महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध समित्यांची कार्यपद्धती, विकासकामांचे नियोजन, नियमावली आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जळगाव महापालिकेत यंदा मोठ्या संख्येने नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय प्रक्रियेची माहिती मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे. महापौर दीपमाला काळे यांनी या प्रशिक्षणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आचारसंहितेमुळे यापूर्वी पुढे ढकलण्यात आलेले प्रशिक्षण आता नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजता नगरसेवक महापालिकेच्या प्रांगणातून खासगी बसने नाशिककडे रवाना झाले.
“प्रशिक्षित नगरसेवक ही काळाची गरज असून, विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि लोकप्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरेल,” असे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाचा शहराच्या विकासकामांवर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

दूध भेसळीची एसआयटी चौकशी करा मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT)...

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

0
पालघर : डहाणू पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र...

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

error: Content is protected !!