देऊळगाव राजा तालुका :(प्रतिनिधी बबनराव नागरे) आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक विठ्ठलराव जाधव सर नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी माळी येथून सेवा निवृत्त झाले होते परंतू गावकरी व मेव्हणा राजा केंद्रातील शिक्षकांच्या वतीने आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी योगीराज लॉन्स येथे सेवापुर्ती गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार डॉ .शशिकांत खेडेकर तसेच प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती नंदाताई कायंदे या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजे लखोजीराव जाधव ,राष्ट्रमाता मा जिजाऊ ,आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार मुर्तीचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थितीत नंदाताई कायंदे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला तसेच पांगरी गावच्या नागरिकांनी शाळेमध्ये लोक वर्गणी करून संगणक लॅब, मुलांना थंड वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी लॅब मध्ये दोन एसी बसविण्यात आले वर्गणी करून शाळेला मदत केल्याबद्दल गावकऱ्याचे नंदाताईंनी भरभरून कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार सिंलखेड राजा मतदारसंघ यांनी जाधव सरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला . सदर कार्यक्रमांमध्ये भास्करराव शिंगणे, बबनराव नागरे, विस्तार अधिकारी दादाराव मुसदवाले, शिवाजीराजे जाधव ,पुष्पाताई काकडे ,राजेंद्र डोईफोडे ,एन के देशमुख, यांनी जाधव सरांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा आपल्या भाषणातून मांडला. जाधव सरांचे मोठे बंधू टेलर यांनी भाऊ कसा असावा याची माहिती आपल्या वाणीतून विशद केली.
सदर कार्यक्रमासाठी राजेश नागरे, बबनराव कुमठे, गजानन वायाळ साहेब,सुखदेव बुरकुल, गंगाधरजी जाधव दादारावजी खरडे, डॉक्टर सुनीलजी कायंदे,सुनील जी शेजुळ, शिंपणे साहेब, प्रकाश जी गीते, गणेश इलग, शंकरराव देशमुख, मदन आंधळे साहेब, अशोक नागरे, भानुदास लव्हाळे सर व्यासपीठावर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना श्री जाधव सर यांनी आपल्या 39 वर्ष सेवा केलेल्या काळात विद्यार्थी घडविण्याचे काम केले बरेच विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, वकील , घडविण्याचे काम केल्याचे सांगितले.शेवटी मेव्हणा राजा केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने सपत्नीक कपडे, साडी चोळी,ट्रॅवलिंग बॅग,शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गावडे सर व उत्कृष्ट संचालन श्री रामेश्वर कुटे यांनी केले.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, आप्तेष्ट, नातेवाईक, स्वाध्याय परिवाराचे अनुयायी आणि मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन शिक्षक भानुसे सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















