Homeताज्या बातम्याशनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; २४ तासांत चोरीचा छडा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; २४ तासांत चोरीचा छडा

३ वेल्डिंग मशिन व १६ ग्राईंडर मशिनचे ५२ हजार ८०० रुपयांचे साहित्य हस्तगत; संशयित ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील भवानीपेठ परिसरातील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन या दुकानातून चोरीस गेलेल्या ३ वेल्डिंग मशिन व १६ ग्राईंडर मशिनच्या बॉक्सचा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा ५२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुकानातून साहित्याची चोरी

दि. ३ ऑगस्ट रोजी नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन या दुकानातून अज्ञात चोरट्याने ३ वेल्डिंग मशिनचे बॉक्स आणि १६ ग्राईंडर मशिनचे बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी दि. ६ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून धागेदोरे

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी हाती घेतला. त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.

संशयित ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

तपासादरम्यान पोलिसांनी वसिम शेख हसन (वय २९, रा. मरीमाता मंदिराजवळ, भिरपुला, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले ३ वेल्डिंग मशिनचे बॉक्स व १६ ग्राईंडर मशिनचे बॉक्स असा एकूण ५२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांचे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, गणेश ढाकणे व योगेश साबळे यांच्या पथकाने केली.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिका की वारुळे साहेबांची जहागिरी? बदल्यांच्या खेळात ‘आर्थिक हितसंबंधांचा’ वास; संतोष वारुळे यांचा...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा एक अजब आणि संशयास्पद खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त...

जामनेर आगारातून नवीन एसटी बस चोरीला; १२ किलोमीटरवर शहापूरजवळ सापडली

0
जामनेर:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. आगाराच्या आवारात उभी असलेली नवीन...

“पुणे तिथे काय उणे? गगनबावड्याच्या बदलीवर ‘सेटिंग’चे ग्रहण; चार महिने उलटूनही अधिकारी पुण्यातच! मंगेश...

0
वनविभागाच्या आदेशाला केराची टोपली; वरिष्ठांचे धाबे दणाणणार, 'अर्थ'पूर्ण व्यवहारांची जोरदार चर्चा? पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्याची हवा आणि येथील खुर्चीची ऊब एकदा लागली की अधिकाऱ्यांना...

प्रल्हाद सोनवणे यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

0
जळगाव जिल्ह्याला प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व; आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प जळगाव | प्रतिनिधी – विनोद पवार भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा...

सात कोटींच्या निधी वळविल्याच्या प्रकरणाची पुनरचौकशी करा; माहिती अधिकारातून धक्कादायक तफावत समोर

0
माहिती अधिकार महासंघाची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे पांडुरंग गायकवाड यांचे निवेदन गंगापूर | प्रतिनिधी जिल्हा परिषद सिंचन विभागातील सन २०१७ मधील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी...

error: Content is protected !!