Homeताज्या बातम्या"पुणे तिथे काय उणे? गगनबावड्याच्या बदलीवर 'सेटिंग'चे ग्रहण; चार महिने उलटूनही अधिकारी...

“पुणे तिथे काय उणे? गगनबावड्याच्या बदलीवर ‘सेटिंग’चे ग्रहण; चार महिने उलटूनही अधिकारी पुण्यातच! मंगेश सपकाळे साहेबांचा ‘आका’ कोण?”

वनविभागाच्या आदेशाला केराची टोपली; वरिष्ठांचे धाबे दणाणणार, ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांची जोरदार चर्चा?

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्याची हवा आणि येथील खुर्चीची ऊब एकदा लागली की अधिकाऱ्यांना इथून पाय काढावासा वाटत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वनविभागात आला आहे. शासनाने पदोन्नती देऊन बदली केली, आदेश निघाले, पण मंगेश सपकाळे साहेब काही पुण्याची खुर्ची सोडायला तयार नाहीत. तब्बल चार महिने उलटले तरी बदलीच्या ठिकाणी हजर न राहणाऱ्या या अधिकाऱ्यासाठी सध्या कोणाची धावपळ सुरू आहे? आणि या महाशयांच्या डोक्यावर नेमका कोणत्या ‘आका’चा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

शासकीय नियमांची उघड पायमल्ली:
२० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने वनपाल ते वनक्षेत्रपाल या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले. या आदेशातील यादीत क्रमांक २ वर असलेले मंगेश विठ्ठल सपकाळे यांची पुणे महसूल विभागातून ‘वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, गगनबावडा, कोल्हापूर’ या रिक्त पदावर तदर्थ पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. शासन आदेशातील नियम क्र. ७ मध्ये अगदी स्पष्ट आणि ठळक शब्दांत नमूद केले आहे की, अधिकाऱ्यांनी आदेश निघाल्यापासून ३० दिवसांच्या आत नव्या जागी रुजू होणे बंधनकारक आहे. पण ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीप्रमाणे, सपकाळे महाशयांनी या नियमाला थेट केराची टोपली दाखवली आहे. आज तब्बल चार महिने उलटून गेले तरी साहेब पुण्यालाच चिकटून आहेत.

वरिष्ठांचे संगनमत की सेटिंगची धावपळ?
शासन निर्णयातील मुद्दा क्र. ३ नुसार, मुख्य वनसंरक्षकांनी या अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या जागी रुजू होण्यासाठी ‘तात्काळ’ कार्यमुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, वरिष्ठांनी या ‘तात्काळ’ शब्दाचा अर्थ बहुधा स्वतःच्या सोयीनुसार ‘कधीही नाही’ असा घेतला असावा. एका अधिकाऱ्याला चार महिने रिलीव्ह न करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी कोणत्या दबावाखाली करत आहेत? सपकाळे यांना पुण्यालाच पुन्हा मलाईदार पोस्टिंग मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर ‘सेटिंग’ करण्यासाठी कोणाची धावपळ सुरू आहे? या संपूर्ण साठमारीमागे असणारा तो ‘आका’ नेमका कोण आहे, ज्याच्या इशाऱ्यावर वनविभागाचे नियमही वाकवले जात आहेत?

वरिष्ठांचे धाबे दणाणणार:
सर्वसामान्यांना नियमांचा बडगा दाखवणारे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच खात्यातील या लालफितशाहीवर मूग गिळून गप्प का आहेत? नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यामागे काही ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्या आहेत का, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. या प्रकरणातील वरिष्ठांचा बोटचेपेपणा आणि अधिकाऱ्याच्या पुण्याच्या प्रेमापोटी सुरू असलेली ही लपवाछपवी आता चव्हाट्यावर आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाही.
शासनाने आता तरी झोपेतून जागे होऊन या ‘सेटिंग’बाज अधिकाऱ्याला तत्काळ गगनबावड्याचा रस्ता दाखवावा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाईचा बडगा उगारावा, अशी तीव्र मागणी होत आहे. अन्यथा, “नियम फक्त कागदावर आणि कारभार मात्र ‘आका’च्या इशाऱ्यावर” हेच वनविभागाचे ब्रीदवाक्य मानावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिका की वारुळे साहेबांची जहागिरी? बदल्यांच्या खेळात ‘आर्थिक हितसंबंधांचा’ वास; संतोष वारुळे यांचा...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा एक अजब आणि संशयास्पद खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त...

जामनेर आगारातून नवीन एसटी बस चोरीला; १२ किलोमीटरवर शहापूरजवळ सापडली

0
जामनेर:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. आगाराच्या आवारात उभी असलेली नवीन...

प्रल्हाद सोनवणे यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

0
जळगाव जिल्ह्याला प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व; आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प जळगाव | प्रतिनिधी – विनोद पवार भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा...

सात कोटींच्या निधी वळविल्याच्या प्रकरणाची पुनरचौकशी करा; माहिती अधिकारातून धक्कादायक तफावत समोर

0
माहिती अधिकार महासंघाची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे पांडुरंग गायकवाड यांचे निवेदन गंगापूर | प्रतिनिधी जिल्हा परिषद सिंचन विभागातील सन २०१७ मधील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी...

ऑगस्ट क्रांती दिन : स्वातंत्र्याच्या ज्योतीपासून राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पापर्यंत

0
 गेवराई तालुका :(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) ९ ऑगस्ट १९४२ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील केवळ एक दिवस नाही , तर तो भारतीय जनतेच्या सामूहिक निर्धाराचा ,...

error: Content is protected !!