Homeताज्या बातम्याप्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न .

प्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न .

पुणे, दि. १९ जुलै २०२५– प्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर, पुणे–५ येथे शैक्षणिक वर्ष २०२४–२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली, तर विशेष उपस्थिती शाळेचे व्हिजिटर मा. सतीश लिंबेकर सर यांनी दर्शवली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले त्या प्रमुख पाहुण्या – शाळेची माजी विद्यार्थिनी आणि सध्या विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या कु. दीप्ती पानसरे आणि सहाय्यक कामगार आयुक्त श्री. दत्तात्रेय पवार. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी शिक्षणातील मूल्ये, पालक-शाळा सहकार्याचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव कशी रुजवावी यावर प्रभावी प्रकाश टाकला.

सभेच्या निमित्ताने वर्षभर शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला. याशिवाय, विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग दाखवणाऱ्या पालकांचा सुद्धा यथोचित गौरव करण्यात आला. हा सन्मान शाळा–पालक सुसंवादाचा आदर्श उदाहरण ठरला.

नवीन शाळा समितीचे मन:पूर्वक स्वागत करताना, मावळत्या समितीच्या सदस्यांना सन्मानचिन्ह व शब्दस्मृती देऊन त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीत त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याचा सर्वांनी गौरव केला.

कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते सूत्रसंचालन शाळेतील लोकप्रिय शिक्षिका सौ. क्लेरा काळे यांनी लीलया सांभाळले. तर, मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना महाजन यांनी आभारप्रदर्शन करत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याचे मन:पूर्वक कौतुक केले. पुढील वर्षासाठीही असाच सहकार आणि जाणीव जागवणारी शाळा संस्कृती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!