Homeताज्या बातम्याMumbai : दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय...

Mumbai : दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय गायकवाड यांचं विधान

मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केलेले आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहे. दक्षिण भारतातील लोकांनी महाराष्ट्र नाचवला. लेडीज बार, डान्सबारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली.

महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका का येतो, मी जे केले मराठी माणसासाठी केले असं सांगत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणावर भाष्य केले आहे. संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मी जे केले ते इथल्या माणसांसाठी केले मग दक्षिण भारतीयांचा तुम्हाला पुळका का आलाय? जर समज देऊन, तक्रार देऊन हे सरळ होत नसतील तर या मार्गाने तात्काळ कारवाई झाली हे आपण पाहिले. मग माझा निर्णय चुकीचा होता की योग्य होता ठरवा. शेवटी ती मारहाण होती. मला आयपीसी कायदे वैगेरे माहिती आहेत. हे फक्त एनसीचे प्रकरण आहे. यात कायद्यानुसार कुठेही शिक्षेची तरतूद नाही. मीपण केसेस लढल्या आहेत. विधान भवनाच्या आत हे असल्याने मी अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना माझी बाजू समजवून सांगेन. माझी चूक असेल तर त्याला जी शिक्षा असेल त्याला सामोरे जायला मी तयार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मार्ग माझा चुकीचा होता हे माहिती होते पण या घटनेसाठी मला करावे लागले. मी वेटरला नाही तर मॅनेजरला मारले. २००-४०० तक्रारी गेल्या ४-५ वर्षात झाल्यानंतरही कॅन्टीनवर कारवाई केली नाही. कारवाईसाठी सांगूनही २-२ महिने अहवाल यायचा नाही.
यामागे कुणाचे साटेलोटे होते, हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वतःला पोटाचा आजार आहे. काही वेडेवाकडे खाल्ले तर मला त्रास होतो. त्यामुळे मी कधी बाहेरचे खात नाही. मला इतके विषारी जेवण दिले जात असेल त्यानंतर माझी जी रिअँक्शन होती ती चुकीची वाटत नाही असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं.
दरम्यान, अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई झाली. त्यामुळे माझा मार्ग चुकीचा होता तरीही मला तो अवलंबावा लागला. त्यामुळेच आज ही कारवाई झाली. येणाऱ्या काळात लाखो लोकांचे आरोग्य त्यातून वाचणार आहे असंही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

0
 निफाड(प्रतिनिधी योगेश कर्डिले) : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे युवक काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हा...

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहरात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श समोर आला आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नितीन विसपुते...

गेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची...

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनची दमदार सुरुवात; क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचा निर्धार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  लेवा समाजातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणाऱ्या लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने उत्साहाचा उच्चांक गाठला. अत्यंत जल्लोषात पार...

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

error: Content is protected !!