Homeताज्या बातम्याभाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

भाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : भाजपला अकोल्यात मोठा धक्का RSS स्वयंसेवक डॉ. अशोक ओळंबे यांचा शिंदे गटात प्रवेश. सविस्तर वृत्त अकोला : अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपचे दीर्घकाळ कार्यरत असलेले डॉ. अशोक कोळंबे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. डॉ. अशोक ओळंबे हे गेल्या सुमारे ३० वर्षांपासून भाजप व संघ परिवाराशी निष्ठेने जोडलेले होते.

त्यांनी पक्षासाठी विविध स्तरांवर काम केले असून, स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभावही लक्षणीय मानला जातो. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्याशी फोन व ईमेलद्वारे संपर्क केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. ओळंबे यांनी अखेर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे अकोला जिल्ह्यातील भाजप संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डॉ. अशोक ओळंबे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात बळकटी मिळणार असल्याचेही मानले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक पातळीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात भाजपसमोर अधिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

डॉ. अशोक ओळंबे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!