Homeमहाराष्ट्रगेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील बालग्राम परिवाराचा लाडका विकास आणि अमरावतीची अनुष्का यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत साधेपणाने आणि तितक्याच भावनिक वातावरणात संपन्न झाला.

एका अनाथ मुलाचा अनाथालयापासून ते एका नामांकित कंपनीतील उच्च पदापर्यंतचा आणि आता हक्काचं घर मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

विकासचे बालपण बालग्राम परिवाराच्या छायेत गेले. आई-वडिलांचे छत्र नसताना बालग्रामने त्याला केवळ निवाराच दिला नाही, तर माया, संस्कार आणि शिक्षणाचे बळ दिले. आपल्या कष्टाच्या आणि बालग्रामने दाखवलेल्या योग्य मार्गाच्या जोरावर विकासने पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केले.

आज तो एका नामांकित कंपनीत सन्मानाने नोकरी करत असून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे. विवाह सोहळ्यादरम्यान विकासच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास उपस्थितांचे मन जिंकून घेणारा होता.

“कधीकाळी आपण एकटे आहोत ही जाणीव असायची, पण आज अनुष्काच्या रूपाने मला हक्काचं ‘आपलं माणूस’ मिळालं आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

बालग्राम परिवारासाठी हा क्षण केवळ एका लग्नाचा नसून त्यांनी जपलेल्या एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान देणारा ठरला.

भपकेबाजपणाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. एका अनाथ बालकाच्या आयुष्यातील पोकळी आज प्रेमाने आणि नात्याच्या विश्वासाने भरून निघाली आहे.

या विवाह सोहळ्याला बालग्राम परिवारातील सदस्य आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आणि अनुष्का या नवदांपत्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे पुढील जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाचे जावो, अशी सदिच्छा गेवराई येथील बालग्राम परिवाराने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!