Homeताज्या बातम्याजुन्या वादातून गोळीबार मित्रावर झाडल्या तीन गोळ्या जखमीवर घाटीत उपचार सुरू

जुन्या वादातून गोळीबार मित्रावर झाडल्या तीन गोळ्या जखमीवर घाटीत उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यात जुन्या वादातून मित्राने गावठी पिस्तुलातून गोळीबार करत तीन गोळ्या झाडल्या. यात युवक गंभीर जखमी असून घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगापूर : जुन्या वादातून एका मित्राने गावठी पिस्तुलामधून गोळीबार केला. यात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. पाच) गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चहाच्या दुकानावर घडली.

गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील आदिनाथ दिलीप जाधव (वय २४) गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास चहाच्या दुकानावर थांबला होता. यावेळी त्याचा मित्र महेश काळे तेथे आला. दोघांतील जुन्या वादातून महेशने आदिनाथवर गावठी पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी आदिनाथच्या पोटाला, दुसरी मांडीत तर तिसरी हाताला चाटून गेली. घटनेनंतर महेश तेथून पळून गेला.

गंभीर जखमी आदिनाथवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, दोन महिन्यांत जामगाव आणि तांदूळवाडीजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक फौजदार दिनकर थोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत दोन जिवंत काडतुसे आणि पुंगळ्या जप्त केल्या.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

गावठी कट्टा बाळगणारे जेरबंद :

बिडकीन शेकटा फाटा शिवारात पोलिस पेट्रोलिंग करत असताना गावठी कट्टा, कोयता बाळगणारे तरुण आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत चार लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली.

धारदार शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेकट्याकडून बिडकीनकडे येणाऱ्या कारची (एमएच ०८ झेड ५०६७) पंचासमक्ष झडती घेतली असता गावठी कट्टा, लोखंडी मॅगझिन, सुरा, एअर गण, लोखंडी धातूचा सत्तूर, लोखंडी धातूचा सुरा आढळून आला. पोलिसांनी कारसह सर्व मुद्देमाल जप्त केला.

सचिन आप्पासाहेब काळे (वय २६), रोमन हरी शिंदे (२६), संदीप तुळशीराम खंडागळे (२६), किशोर तुळशीराम मुके (२३, सर्व रा. मांडवा, ता. गंगापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनि नीलेश शेळके, पोउपनि महेश घुगे, विष्णू गायकवाड, सूरज ढवळे, योगेश वाघमोडे यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!