Homeताज्या बातम्याविवाहित महिला राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून उतरताना सुमारे दीडशे फूट कोसळून मृत्यू झाल्याची घटना...

विवाहित महिला राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून उतरताना सुमारे दीडशे फूट कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

वेल्हे, (पुणे) – किल्ले राजगड (ता. राजगड) येथे पर्यटनासाठी पतीसह आलेल्या विवाहित महिला बालेकिल्ल्यावरून उतरताना सुमारे दीडशे फूट कोसळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. ५) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

रात्री उशिरा वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिवाजी कुरणकर यांनी महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली असून, याबाबत अधिक तपास वेल्हे पोलिस करत आहेत.

कोमल सतीश शिंदे (वय-20) राहणार आळंदी, ता. खेड पुणे असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिस म्हणाले,’ कोमल ही पतीसह राजगडावर पर्यटनासाठी आली होती.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर उतरताना ती कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी पोलीस जवान युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर, सनी माने, यांनी गडावर धाव घेत स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह गडावरून खाली आणला.

दुपारी पाऊस पडल्याने गडावरील वाट निसरडी झाल्याने मृतदेह खाली आणण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी कुरणकर यांनी कोमल हिचा उपचारा पूर्वी मृत्यू झाल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!