Homeताज्या बातम्या'पालखी महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा' : उपमुख्यमंत्री अजित पवार

‘पालखी महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून रणकंदन पाहायला मिळाले. पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी हडपसर-सासवड-जेजुरी रस्त्याच्या कामांवर होत असलेल्या अपघातांवरून आक्रमक पवित्रा घेतला.

अखेर पालकमंत्री अजित पवार यांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक विधानभवन पुणे येथे गुरुवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार व सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी शिवतारे यांनी बैठकीत मांडलेली आकडेवारी पाहून पालकमंत्री अजित पवार देखील अवाक झाले. बैठकीत शिवतारे म्हणाले, पालखी महामार्गावर दिवे घाटापासून निरापर्यंत मागील दीड वर्षात 137 अपघात झाले असून, यात 101 लोक मृत्युमुखी पडले. तर 133 लोक जबर जखमी झाले आहेत.

महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न करता प्रचंड निष्काळजीपणाने काम चालविले आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक व माहितीदर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनांचे जबर अपघात होत आहेत. गेल्या काही दिवसांत बेलसर फाटा, ढुमेवाडी, दिवे परिसरात मोठे अपघात होऊन जवळपास 7 ते 8 लोक दगावले आहेत.

बेलसर फाट्यावर मृत्युमुखी पडलेल्या तिघांची व्यथा शिवतारे यांनी या वेळी सभागृहात मांडली. ती ऐकताच पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम हे देखील शिवतारे यांच्या कचाट्यातून सुटले नाहीत. कदम हे बेजबाबदार अधिकारी असून, अशा पद्धतीने वागाल तर तुमच्याही कुटुंबाचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवतारे यांनी सुनावले. या वेळी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!