Homeताज्या बातम्यासुलभा खोडके अजितदादांच्या राष्ट्रवादीत, अमरावतीतून लढणार

सुलभा खोडके अजितदादांच्या राष्ट्रवादीत, अमरावतीतून लढणार

मुंबई : अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
आमदार सुलभा खोडके यांच्यासमवेत अमरावतीचे माजी महापौर शेख जफर शेखजब्बार, सरचिटणीस अ‍ॅड. शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयुब भाई, सचिव आसिफभाई अशरफ अली, समाजसेवक हाजी रफिक, अ‍ॅड. शब्बीर भाई, अ-रज्ज्जाक उर्फ रज्जु चचा, जोएब भाई बरहानपुरवाली, आणि मुस्तफा भाई बुरहानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्वांचे अभिनंदन करतानाच आपण सर्व मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट होऊया आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देऊया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून काँग्रेस पक्षाने सुलभा खोडके यांची हकालपट्टी केली. सुलभा खोडके यांनी पक्षासमोर खुलासा करूनही पक्षाने त्यांचे ऐकले नाही. सरतेशेवटी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी सुलभा खोडके यांना विधानसभा निवडणुकीकरीता एबी फॉर्मही दिला.

सुलभा खोडके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. आता विद्यमान आमदार म्हणून त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्‍नीथला हे अमरावतीच्‍या दौऱ्यावर असताना आयोजित कार्यक्रमांमध्‍ये आमदार म्‍हणून आपल्‍याला सन्‍मान देण्‍यात आला नाही, अशी खंत व्यक्त करीत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली.

राष्‍ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्‍या झाल्याने अजित पवार यांनी अमरावतीतील जनसन्मान यात्रा रद्द केल्याने सुलभा खोडके यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. अखेर बुधवारी 23/10/2024 त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!