Homeताज्या बातम्यामॉर्निंग वॉकला गेले अन् टोळक्यांच्या हल्ल्यात जीव गमावून बसले...

मॉर्निंग वॉकला गेले अन् टोळक्यांच्या हल्ल्यात जीव गमावून बसले…

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. टोळीयुद्धाच्या बातम्या येतात. सर्वाधिक सुरक्षित शहर असलेले पुणे शहरात आता काय चाललंय? असा प्रश्न प्रत्येक पुणेकरांना पडला आहे. कारण पुणे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरलाय नाही.

पुणे शहरात सकाळी मॉर्निंग वॉक बाहेर निघालेल्या व्यक्तीला आज शेवटचा दिवस असणार? अशी कल्पनाही नसणार. सांस्कृतिक पुण्यात दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करण्यात आला. पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात हा हल्ला झाला. त्यात ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. समीर रॉय चौधरी असे त्यांचे नाव आहे. आता या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील तीन अल्पवयीन आरोपी आहेत.

काय घडला प्रकार

समीर रॉय चौधरी सकाळी घरुन मॉर्निंग वॉकसाठी निघाले. ते टाटा कंपनीतून सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी, १३ जून रोजी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेले चार जणांचे टोळके बाहेर पडले होते. या टोळक्याला आणखी दारू हवी होती. त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले.

तीन आरोपी अल्पवयीन

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याचा समावेश आहे. इतर तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. मागील आठवड्यातच ज्युव्हीनाईल कोर्टाने त्या दोघांची बाल निरीक्षण गृहातून जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्हे हा चिंतेचा विषय बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!