Homeताज्या बातम्यामालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल ; शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानाचा...

मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल ; शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल सज्ज…

मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल ; शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल सज्ज… 

दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा, औंध व बाणेर येथे नविन बालवाडीचे वर्ग सुरू
पुणे, दि 10 मे :- तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रूचीपूर्ण होते. हे सूत्र लक्षात ठेऊन ध्रुव ग्लोबल स्कूल ने बालवाडी पासून ते विद्यापीठस्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करत आता नव तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंध व बाणेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत केली. 
अनिष्का मालपाणी म्हणाल्या, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणार्‍या मालपाणी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल केले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी घोकंपट्टीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिकविण्याची ही पद्धत बदलल्या नंतर आता त्याला नव तंत्रज्ञानाची वैशिष्टपूर्ण जोड दिली आहे.
विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा. आपल्या मूल्यांची जपणूक करीत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे. अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी मालपाणी ग्रुप ने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे. या नुसार प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबर कला, क्रीडा किंवा अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करीत आहे, याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल. यासाठी तयार केलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पनानिहाय सखोल माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे. त्यानुसारच शिक्षकांनी त्याच्या व्यक्तिगत गरजेनुसार शिकवता येईल.
यशोवर्धन मालपाणी यांनी सांगितले की, ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. तसेच येणार्‍या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन-अध्यापन  पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणार्‍यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा या वर्षी सुरू केली आहे. तसेच औंध आणि बाणेर परिसरात या वर्षीपासून ध्रुव तर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करीत आहोत.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, क्रीडा व योगाच्या क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. याची दखल कॅलिफोर्निया, बोस्टनसारख्या जगातील शीर्ष विद्यापीठांनी घेतली आहे. ध्रुव ग्लोबल स्कूल ज्या पद्धतीने शैक्षणिक प्रयोग करीत आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी पालकांनी उंड्री व सूस येथील शैक्षणिक संकुलला भेट देण्यासाठी आवाहन केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!