Homeताज्या बातम्याखाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात ‘कडीया सांसी’ गावच्या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने ब्रह्मपुरी येथील एका ६४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला लुटले होते. पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत आरोपींकडून चोरीला गेलेली २५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दोन बँकेचे पासबुक हस्तगत केले असून, हा मुद्देमाल मूळ मालकाला परत केला आहे.

रामचंद्र सखाराम मोहुर्ले (वय ६४ वर्षे, व्यवसाय- शेती, रा. अडयाळ टेकडी, ता. ब्रह्मपुरी) हे काही कामासाठी शहरात आले असता चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून रोख रक्कम आणि बँकेचे दोन पासबुक लंपास केले होते. कष्टाची कमाई चोरीला गेल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्याने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ भादंविऐवजी लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) आणि अप.क्र. ५४०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ब्रह्मपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. संशयितांचा मार्ग काढत असताना पोलिसांना ही टोळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील ‘कडीया सांसी’ येथील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. हे गाव देशभरात बँक आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांसाठी कुख्यात आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ब्रह्मपुरी पोलिसांनी धाडसी सापळा रचून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

अटक केलेले आरोपी:

१) रिहान सिकंदर सिसोदीया (वय २१ वर्षे)२) रितीक निरज सिसोदीया (वय २५ वर्षे)३) प्रकाश गजराजसिंग सिसोदीया (वय २६ वर्षे)४) असवंत भारतसिंग सिसोदीया (वय २८ वर्षे)(सर्व रा. कडीया सांसी, ता. पचोर, जि. राजगड, मध्य प्रदेश)

आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेली २५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दोन्ही पासबुक आज अधिकृतपणे फिर्यादी रामचंद्र मोहुर्ले यांना सुपूर्द केली. कष्टाचे पैसे परत मिळाल्याने वृद्ध शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते, त्यांनी पोलिसांचे आभार मानले.ही धडक कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. या कारवाईमुळे आंतरराज्यीय चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

error: Content is protected !!