जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२९ जून) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिलेश किशोर कोळी (वय २१) हा तरुण राजस्थान येथे रेल्वे प्रशिक्षण पूर्ण करून नुकताच गावी परतला होता. सोमवारी तो आपल्या वडिलांसह व मजुरांसोबत गट क्रमांक ६० मधील शेतात पेरणीचे काम करत होता. दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी विजेचा जोरदार प्रहार झाल्याने खिलेश हा जागीच बेशुद्ध पडला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या वडिलांनी व मजुरांनी तातडीने त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडील, भाऊ, बहीण व नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनीही खिलेश हा मेहनती, मनमिळावू व होतकरू युवक असल्याचे सांगत त्याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
पावसाळ्यात शेतातील कामे करताना विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ
RELATED ARTICLES
- Advertisment -
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...
शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
योजनेंतर्गत...
वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...
वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा...
सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...