सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव गीते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य तसेच राज्यभरातील एड्स नियंत्रण कर्मचारी उपस्थित होते. संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या, कर्मचारी हिताचे प्रश्न तसेच आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणाबाबतचे निवेदन आमदार गीते यांना सादर करण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आमदार गोकुळ गीते यांच्या नेतृत्वावर, कार्यक्षमतेवर, लोकाभिमुख कार्यशैलीवर तसेच जनसामान्यांशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कावर विश्वास व्यक्त केला. कर्मचारी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना आमदार गोकुळ गीते यांनी संघटनेने व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. कर्मचारी हिताशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देत सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.






















