Homeताज्या बातम्याउत्पादन शुल्क विभागाचा छापा! दोन लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा...

उत्पादन शुल्क विभागाचा छापा! दोन लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा…

पुणे : उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे भरारी पथक क्र २ ने रविवारी (ता.२८) छापा टाकला आहे.

या छाप्यात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क हवेली तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अचानक छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी ४५०० लिटर कच्चे रसायन व ३५० लिटर दारू असा सुमारे १ लाख ९५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. तर दोन अज्ञात इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हि कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. शितोळे दुय्यम निरीक्षक आर डी. भोमले जवान के. आर. पावडे, के. एस. मुस्लापूरे, वाहन चाल‌क ए. आर सिसोलेकर यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

error: Content is protected !!