Homeताज्या बातम्याराज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात परिवर्तन होणार नाही ठाकरे गटाने लगावला टोला.

राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात परिवर्तन होणार नाही ठाकरे गटाने लगावला टोला.

राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात परिवर्तन होणार नाही ठाकरे गटाने लगावला टोला…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी उमेदवारही जाहीर केले असून, बेबनाव कमी होताना दिसत आहे.

तर, भाजपासह राज्यातील महायुती जागावाटप आणि उमेदवारांबाबत चाचपणी करताना दिसत आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्षाचा लोकसभा निवडणुका लढवण्याचा मानस दिसत असून, त्यादृष्टिने बैठका, गाठीभेटी घेतल्या जात आहेत. यावरून ठाकरे गटाने टोला लगावला आहे.

मनसे पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्यासाठी तयारी करत आहे. राज ठाकरे विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. तसेच महायुतीत सहभागी होण्याविषयी चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होईल, असे नाही

राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. मागच्या वेळेस लाव रे तो व्हिडिओ सांगत काही व्हिडिओ दाखवले होते. माझ्या मते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार केला होता. कारण तेव्हा भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. त्यांचे नेहमीच इकडे-तिकडे, तळ्यात-मळ्यात असे सुरू असते. राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होईल, असे वाटत नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काही चर्चा सुरू आहेत. मात्र, अधिकृतरित्या कोणतेही उमेदवार आणि कोणत्याही जागा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. सर्वच ४८ जागांवर उमेदवारीसाठी चाचपणी आम्हीही केली आहे. त्यामुळे सर्व ४८ जागांवर आमचेही उमेदवार तयार आहेत. पण अधिकृतरित्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चित झालेली नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!