Homeताज्या बातम्यापुण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; वापर न केल्यास...

पुण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; वापर न केल्यास आयुक्त करणार कारवाई…

पुणे : पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळ्यास कारवाई करण्यात येईल अशीही ताकीद देण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी ज्या-ज्या शहरांमध्ये काम केले आहे तेथे दुचाकीस्वाराला हेल्मेट सक्ती केली होती. यामुळे अमितेश कुमार यांना पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हेल्मेट सक्ती बाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे हे कायद्याने अनिवार्य असल्याने स्वतःहून हेल्मेट परिधान केले पाहिजे असे सांगितले होते.

नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर संबंधित घटकाशी चर्चा करून कारवाईला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी (ता। १४) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. त्याचवेळी कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासुन करावी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवावे असे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे शहरात हेल्मेट सक्ती नसल्याचे सांगण्यात येत असले तरीही वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सुमारे ४ लाखांहून अधिक वाहनचालकांवर विनाहेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये पुणे आरटीओ ने खासगी कंपन्यांना नोटीस पाठवून कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!