Homeताज्या बातम्यानव्या राजकीय वाटचालीची सुरुवात मी भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण...

नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात मी भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले

नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात मी भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले…

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज ते भाजपात प्रवेश करत आहेत.

मी माझ्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात करतोय. मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षप्रवेशापूर्वी अशोक चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होतोय. माझ्या नव्या राजकीय आयुष्याची ही सुरुवात आहे. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी कुठल्याही कामासाठी घरातून निघताना पूजा करतो. हे नित्यनियम आहे. काँग्रेसचा विषय संपला आहे. आता नवीन सुरुवात होतेय असं त्यांनी म्हटलं.

अशोक चव्हाणांची कारकिर्द

काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १९८२ मध्ये अशोक चव्हाणांनी सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते काम करत होते. १९८७ च्या नांदेड पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. शरद पवारांच्या सरकारमध्ये ते राज्यात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. २००८ आणि २००९ या काळात दोनदा अशोक चव्हाणांवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१४ मध्ये मोदी लाटेतही नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडून आले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन-चार दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

0
रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६...

error: Content is protected !!