Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलासोबत वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला...

अल्पवयीन मुलासोबत वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक…

पिंपरी : अल्पवयीन मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली. भोसरी, पिंपरी, शिरुर व इतर भागातून दुचाकी चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले. त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख ३० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या.

वाॅशिंगसेंटरवर काम करून उर्वरीत वेळेत तो दुचाकी चोरी करायचा. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. 

मोहंमद राशीद शाहीद शेख (२०, रा. वल्लभनगर, पिंपरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू होती. त्यात मोहंमद राशीद हा संशयितपणे वावरताना आढळला. सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. 

सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार हेमंत खरात, डी. बी. केंद्रे, रमेश भोसले, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

चोरीच्या दुचाकी कंपन्यांच्या पार्किंगमध्ये

मोहंमद राशीद हा एका १६ वर्षीय मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करायचा. चोरलेली दुचाकी एमआयडीसीतील कंपन्यांच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क करायचा. काही दिवसांनंतर ती चोरीची दुचाकी पुन्हा इतर ठिकाणी पार्क करायचा. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!