Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार आरोपीवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार आरोपीवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अत्याचार आरोपीवर गुन्हा दाखल…

पुणे: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणात ३७ वर्षीय आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा आदेश दिला.

आरोपीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंडाची रक्कम पीडितेस देण्यात यावी तसेच ती न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

विनायक शांतवन शिंदे (वय 37) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत, 16 वर्षीय मुलीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2013 मध्ये हा प्रकार घडला. पीडिता ही शाळेतून घरी जात असताना शिंदे याने तिचा पाठलाग करत पीडितेस तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्या घरी आली नाहीस तर तुला शप्पथ आहे असे सांगून घरी घेऊन गेला. त्यानंतर, तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. घरचे रागावतील या भीतीने पीडितेने याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर, ही माहिती इंडिया स्पॉन्सरशिप संस्थेस कळविण्यात आली त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आईस संपर्क करत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणात, सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील संध्या काळे यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

error: Content is protected !!