Homeताज्या बातम्याशेवटी ससूनला मिळाले ३८ हजार सलाइन ; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत...

शेवटी ससूनला मिळाले ३८ हजार सलाइन ; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत…

पुणे: ससून रुग्णालयाला अखेर १०० मिलीच्या ३८ हजार सलाइनच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार आहे.

त्यामुळे आता रुग्णांच्या उपचारासाठी काेणतीही बाधा येणार नाही.

अँटिबायोटिकचे इंजेक्शन किंवा औषध हे शंभर मिलीलिटर सलाइनमध्ये व्यवस्थित मिसळते, त्यामुळे पेशंटला देण्यासाठी बहुतांश वेळा या सलाइनचा वापर करण्यात येतो, तसेच रुग्णांच्या शरीरातील सोडिअम कमी झाल्यावरही याचा वापर केला जातो. त्यासाठी माेठ्या ५०० मिली सलाइनची आवशकता नसते, म्हणून या १०० मिली सलाइनचा वापर वाढला आहे, परंतु ससून रुग्णालयामध्ये शंभर मिलीलीटर सलाइनचा तुटवडा झाला हाेता. पुढील तीन आठवड्यांपुरताच साठा शिल्लक हाेता.

याबाबत दैनिक ‘लाेकमत’मध्ये ‘नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती नाही ना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याबाबत शासनाचे लक्ष वेधले हाेते. औषधांची हाफकिनकडून बंद झालेली औषध खरेदी व नवीन औषध खरेदी प्राधिकरणाचे कामकाज सुरू न झाल्याने वैद्यकीय रुग्णालयांमधील औषध खरेदी रखडली आहे.

राज्य सरकारने हाफकिन संस्थेकडून औषधांची होणारी खरेदी बंद केली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी करावी लागते. नांदेड प्रकरणात एकूण निधीपैकी ३० ते ४० टक्के निधीतून स्थानिक पातळीवर खरेदी करता येते.

शासनाच्या नियमानुसार व त्यांनी दिलेल्या दरांनुसार, स्थानिक पातळीवर ससून रुग्णालयाने १०० मिलीच्या ३८ हजार सलाइनच्या बाटल्यांची खरेदी केली आहे. त्या सलाइन पुढील ३ महिन्यांसाठी पुरणार आहेत. काेणत्याही औषधांचा आता तुटवडा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!