Homeताज्या बातम्याचोरी पकडल्यामुळे रुग्णवाहिका चालकाची केली हत्या ; नेरुळमध्ये रुग्णालयाबाहेर भित्तीचे वातावरण...

चोरी पकडल्यामुळे रुग्णवाहिका चालकाची केली हत्या ; नेरुळमध्ये रुग्णालयाबाहेर भित्तीचे वातावरण…

वी मुंबई : एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याच्या मालाची चोरी होताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बाहेरच हा थरारक प्रकार घडला.

या घटनेवरून पुन्हा एकदा नेरुळ परिसरातील फेरीवाल्यांची गुंडगिरी उघड झाली आहे.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाबाहेर रविवारी रात्री ही घटना घडली आहे. पदपथावर भुर्जीपाव, नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागत असतात. त्याच परिसरात खासगी रुग्णवाहिकादेखील उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रुग्णवाहिकांचे चालक परिसरात बसून असतात. स्पंदन कार्डिक रुग्णवाहिकेचा चालक युवराज सिंह (३०) याने काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. परिसरात भुर्जीपाव, वडापाव विकणाऱ्याने व मित्राने मनोज साबणे याच्या टेम्पोतून नारळ चोरले होते.

फेरीवाल्यांची गुंडगिरी…
युवराज याला रविवारी रात्री एकाने फोन करून भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार सहकारी ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेतून युवराज हा डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे चालला होता. त्यांची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहोचताच दबा धरून बसलेल्या चौघांनी युवराज याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच रुग्णवाहिकेवरही त्यांनी हल्ला केला. त्यामुळे ज्ञानेश्वर याने तेथून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला. युवराज याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी चौघांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

म्हसवडमध्ये पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागरिकांचा टाहो प्रशासन जागे होणार का

0
म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : शहरात सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे. या...

शिरपूरात जल्लोष! बबनराव चौधरींच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांत उत्साह

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता...

error: Content is protected !!