Homeताज्या बातम्यासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल जाहीर; महाविकास आघाडीला मोठ्ठा...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल जाहीर; महाविकास आघाडीला मोठ्ठा धक्का…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल जाहीर; महाविकास आघाडीला मोठ्ठा धक्का…

खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर: खुल्या प्रवर्गाची दुसऱ्या फेरीची मतमोजणी अद्यापही सुरू…
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये एबीव्हीपी प्रणित विद्यापीठ विकास मंच पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. विद्यापीठ विकास मंच पॅनलचे आत्तापर्यंत 7 उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे चूलत बंधू प्रसेनजित फडणवीस यांचाही समावेश आहे. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजित फडणवीस यांना 4,447 मतं पडली, तर याच प्रवर्गातून 3,711 मतांसह सागर वैद्य हेदेखील विजयी झाले. सिनेट निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास मंचचे फडणवीस आणि वैद्य यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल  मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत.
 
खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्यांची यादी.
१ – प्रसेनजीत फडणवीस ४ हजार ४४७
२ – सागर वैद्य ३ हजार ७१
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते.  ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
दरम्यान सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे , ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टीप ;- यामध्ये आणखीन अपडेट येणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!