दौंड :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने लहुजी सेना ग्रुप (भाजी मंडई) व जनसेवक रुपेश बंड यांच्या पुढाकाराने गांधी चौक येथे मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाले. दौंडकर नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून २३० गरजू नागरिकांनी आरोग्य तपासण्या व उपचाराचा लाभ घेतला.
कार्यक्रमास आमदार राहुल कुल, माजी जि.प. सदस्य वीरधवल जगदाळे, माजी पंचायत समिती सभापती आप्पासो पवार, डॉ. समीर कुलकर्णी, तसेच शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना दिली व नागरिकांशी संवाद साधला.
या उपक्रमामध्ये आदित्य भोसले, सुरज सकट, बाबू मोघे, विशाल कोयलकर, आकाश पळसे, पप्पू आरके, काळू गुपचे, कुणाल बंड यांचा मोलाचा सहभाग होता.
सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा उपक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि समाजहिताच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरली.






















